"नजर" पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने

     

    आज ही पोस्ट माझ्यासाठी खूप विशेष आहे कारण आज "नजर" ह्या मराठी काव्यसंग्रहाची digital कॉपी प्रकाशित होतेय. हे पुस्तक Google play वर खाली दिलेल्या लिंक वर available आहे तसेच पुस्तकाची hard copy देखील उपलब्ध आहे.

नजर google play link. हार्ड कॉपी येथे उपलब्ध आहे.

     आजपर्यंत ह्या blog वर वेळोवेळी अनेक कविता मी पोस्ट केल्या ज्याला खूप छान प्रतिसाद मिळाला हा काव्यप्रवास माझ्यासाठी खूप विशेष होता.खूप वेळा आपल्याया एखादी गोष्ट आवडते जी आपण profession म्हणून choose करतो असे नाही पण त्या छंदात, त्या कामात तुम्हाला जे समाधान मिळते ते बाकी सगळ्या पेक्षा मोठे असते.मलाही काही वर्षाच्या gap नंतर सुरु झालेला हा कवितांचा प्रवास खूप काही देऊन जात आहे.

       ह्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये माझ्यासाठी त्या कवितेत मांडायचा "विचार" कायम महत्वाचा होता, मग त्याला साजेसे शब्द आणि त्यातून फुलणारे काव्य हा अनुभव जितका आनंद देणारा होता, तितकाच अंतर्मुख करणारा होता.अनेकदा जी कविता सुचतेय  तो विचार सतत मनात असताना, तो विचार तुमचा ताबा घेतो तुम्हाला दुसरे काहीही सुचू देत नाही आणि स्वतः कडे आणि जगाकडे एका त्रयस्थ नजरेतून पाहायला शिकवतो.तसे पहायचे असेल तर तुम्हाला आधी तुमचे घट्ट पकडून ठेवलेले व्यक्तिमत्व सोडून थोडं मोकळे व्हावे लागते.तरच त्याची मजा अनुभवता येते आणि हाच भाग मला प्रचंड भावतो.Erol Ozan ह्या लेखकाने एका ठिकाणी म्हटलंय "Some beautiful paths can't be discovered without getting lost"

       ह्या पुस्तकाला "नजर" हे नाव दिलय कारण तोच अनुभव , प्रसंग प्रत्येकजण त्याच्या त्याच्या नजरेतून  पाहत असतो पण तो देखणा, संकुचित, हृदयस्पर्शी नक्की कसा आहे हे त्या त्या नजरेवर ठरतं. मी देखील ह्या पुस्तकात माझ्या नजरेतून पाहिलेले, कल्पनेत जगलेले अनेक क्षण काव्यरुपात मांडलेत.आणि नजरेच्या विविध छटा सांगणारी एक नजर नावाची कविता ही ह्या काव्यसंग्रहात आहे.

       हे पुस्तक नक्की वाचाआणि ह्या पुस्तकाबद्दल आपले अभिप्राय मला कळवा.

Comments

Popular posts from this blog

The mystic meaning of Shree Saraswathi Yanthram

My next book is for all of you: Untold Nakshatra Jyotish (Fifth Edition)

Life Summary Report

New Book: Untold Planetary Transits -Simple Way to Accurately Predict Timing of Events

Vedic Astrology: Planetary Strengths or Graha Bala