"नजर" पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने
आज ही पोस्ट माझ्यासाठी खूप विशेष आहे कारण आज "नजर" ह्या मराठी काव्यसंग्रहाची digital कॉपी प्रकाशित होतेय. हे पुस्तक Google play वर खाली दिलेल्या लिंक वर available आहे तसेच पुस्तकाची hard copy देखील उपलब्ध आहे. नजर google play link . हार्ड कॉपी येथे उपलब्ध आहे. आजपर्यंत ह्या blog वर वेळोवेळी अनेक कविता मी पोस्ट केल्या ज्याला खूप छान प्रतिसाद मिळाला हा काव्यप्रवास माझ्यासाठी खूप विशेष होता.खूप वेळा आपल्याया एखादी गोष्ट आवडते जी आपण profession म्हणून choose करतो असे नाही पण त्या छंदात, त्या कामात तुम्हाला जे समाधान मिळते ते बाकी सगळ्या पेक्षा मोठे असते.मलाही काही वर्षाच्या gap नंतर सुरु झालेला हा कवितांचा प्रवास खूप काही देऊन जात आहे. ह्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये माझ्यासाठी त्या कवितेत मांडायचा "विचार" कायम महत्वाचा होता, मग त्याला साजेसे शब्द आणि त्यातून फुलणारे काव्य हा अनुभव जितका आनंद देणारा होता, तितकाच अंतर्मुख करणारा होता.अनेकदा जी कविता सुचतेय तो विचार सतत मनात असताना, तो विचार तुमचा ताबा घेतो तुम्हाला दुसरे काहीही सुचू दे